
.ओझर दि.१५ (वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाजाचे ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात अभियंता दिनानिमित्त सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे तांत्रिक विभागाचे अधिव्याख्याता यश बोरसे विज्ञान शिक्षक आत्माराम शिंदे बाबासाहेब गायकवाड उज्वला कदम विनिता शिंदे मोहिनी चौधरी यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक शिक्षिका उज्वला कदम यांनी केले. सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवन कार्यावर प्रांजल सोनवणे सिद्धेश मोरे यांनी भाषणे केली. वर्गशिक्षक बाबासाहेब लभडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. फलक रेखाटन मोनाली निकम वर्षा पाटील मोहन क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.
