
सिन्नर ( प्रतिनिधी ) -सिन्नर तालुका बारा बलुतेदार व आलुतेदार महासंघाचे वतीने भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांची जयंती व आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन माननीय श्री इंजिनियर राजेंद्रजी रावले साहेब सेवानिवृत्त उप अभियंता जलसंपदा विभाग यांचे अध्यक्षतेखाली हॉटेल पंचवटी येथे संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत तालुक्यातील अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या इंजिनिअर मान्यवरांचा सत्कार सोहळा ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बारा बलुतेदार व आलुतेदार महासंघाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष कैलासवासी बाळासाहेब पेंढारकर यांचे काल आकस्मित निधन झाले त्यांना सर्व उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष श्री किरण भाऊ कोथमीरे शहराध्यक्ष विनोद शितोळे महामित्र दत्ताजी वायचळे संघाचे जेष्ठ मार्गदर्शक देवन पल्ली सर भानुदास मेंगाळ डॉक्टर अत्रे बाळासाहेब सदगीर अशोक सोनवणे जिल्हा सचिव अनिल सरवार खजिनदार रवींद्र गिरी संघाचे उपाध्यक्ष दत्तू गोफणे ज्येष्ठ मार्गदर्शक तुकाराम सदगीर सर किरण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री तुकाराम सदगीर सर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात बारा बलुतेदार व अलुतेदार महासंघा ने वर्षभरात जे वेगवेगळे उपक्रम राबविले त्यामध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा महिलांचा गुणगौरव सोहळा उद्योजकता विकास शिबिर 5 सप्टेंबर रोजी शिक्षकांचा यथोचित सत्कार राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम संघाच्या सर्व सभासदांचे वाढदिवस असे विविध उपक्रम या महासंघाद्वारे राबविले जातात असे आपल्या प्रास्ताविकात नमूद केले यावेळी तालुक्यातील इंजिनियर्स यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला त्यामध्ये श्री संजय आनेराव श्री राजेंद्र रावले साहेब श्री विनोद शितोळे शाहूराज कुंभार श्री पुष्कराज मेंगाळ साहेब (एम एस ई बी चे अभियंता )श्री संजय चांडोले श्री निवृत्ती गफले श्री विकास पांडुरंग बिन्नर श्री करण बेनके अमर देवन पल्ली शुभम गोसावी खलील सय्यद उदयसाळी योगेश पवार शंतनू कानडे सागर आरणे बाळासाहेब वाघ ऋषिकेश भालेराव पराग काळोखे सुयोग लोणारे आदित्य लांडगे सौरभ लोणारे वैभव जाधव तेजस साळवे अक्षय नाईक साहिल कटारे या सर्व इंजिनियर्स यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारमूर्तींपैकी श्री संजय आणेराव श्री पुष्कराज मेंगाळ साहेब योगेश पवार करन बेनके श्री बाळासाहेब सदगीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच महासंघाच्या वतीने श्री रवींद्र भाऊ गिरी यांना नाशिक जिल्हा गिरी गोसावी समाजातर्फे नवोद्योजक म्हणून नुकताच पुरस्कार मिळाला त्याबद्दल संघाने रवींद्र गिरी यांचाही शाल गुच्छ देऊन विशेष असा सत्कार यावेळी केला या कार्यक्रम प्रसंगी महामित्र दत्ताजी वायचळे यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या बद्दल विशेष अशी माहिती सांगितली व आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन आहे या याविषयी माहिती सांगितली यावेळी त्यांनी लोकशाहीचे महत्त्व विशद केले एका मताला किती किंमत आहे हे त्यांनी सखोल सांगितले एकूणच भारतीय संविधानाबद्दल माहिती दिली दिली तसेच डॉक्टर विष्णू अत्रे श्री किरण जाधव श्री बाळासाहेब सदगीर श्री किरण भाऊ कोथमीरे श्री देवन पल्ली सर यांनीही आपली मनोगते व्यक्त करून सर्व सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या तसेच श्री राजेंद्र रावले साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची सखोल माहिती सांगितली त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की एक डॉक्टर जर चुकले तर एका व्यक्तीचे नुकसान होईल पण एक इंजिनियर अभियंता चुकला तर हजारोंचे नुकसान होईल अशी इंजिनियर्स चे महत्व व त्यांच्या जबाबदारीची जाणीव त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना सर्व उपस्थिताना श्री दत्तू भाऊ गोफणे यांनी स्वखर्चाने चहा पाण्याची व्यवस्था केली शेवटी संघाचे जिल्हा सचिव श्री अनिल भाऊ सरवार यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले
