
सिन्नर ( प्रतिनिधी) मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय, सिन्नर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तालुकास्तरीय कै.सौ.लक्ष्मीबाई लेले वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दि १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. विद्यालयात घेण्यात येणार आहे.३ री ४ थी प्राथमिक गट५ वी ते ७ वी लहान गट८ वी ते १० वी मोठा गट११ वी १२ वी उच्च माध्यमिक गट अशा गटांमध्ये घेण्यात येणार आहे. विजेत्यांना रोख रकमेचे पारितोषिक व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तरी या स्पर्धेत तालुक्यातील शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 99225 90790 या नंबरवर संपर्क साधावा.
