
**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२९ वा दिवस* आध्यात्मिक जीवनाला जर सर्वात जास्त कशाचे साहाय्य होत असेल तर ते ध्यानाचे होय. ध्यानामधे आपल्या साऱ्या भौतिक उपाधी आपण टाकून देतो आणि आपल्या दिव्य स्वरूपाचा अनुभव घेतो. ध्यान करतेवेळी आपल्याला कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून राहावे लागत नाही. ध्यान हीच सर्वश्रेष्ठ गोष्ट होय. मनाची ध्यानावस्था ही आध्यात्मिक जीवनाच्या सगळ्यात जवळची अवस्था होय. आपल्या दैनंदिन जीवनात ध्यानाचा क्षण हा असा एकच क्षण असतो की ज्या वेळी आपण ऐहिकतेपासून पूर्णपणे अलिप्त असतो. या क्षणी सर्व जड पदार्थांपासून अलिप्त राहून आत्मा स्वतःचेच चिंतन करीत असतो. या क्षणी आपल्याला आत्म्याचा अद्भुत संस्पर्श होत असतो.
*स्वामी विवेकानंद…* *
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २४ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५
★अविधवा नवमी श्राद्ध
★ भारतीय अभियंता दिन.
★ १८६० अभियंते, विद्वान, मुत्सद्दी, म्हैसूर संस्थानचे दिवाण भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन.
★ १९५३ श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड
★ १९५८ दिल्ली दूरदर्शनचे प्रेक्षपण प्रायोगिक तत्त्वावर सुर झाले.
★ दूरदर्शन दिन.
★ आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
