
शिरसगाव (प्रतिनिधी ) .दि.१२ सप्टेंबर २०२५ वार शुक्रवार रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या तर्फे अनुदानित आश्रमशाळा प्रिंपी येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत शासकीय आश्रमशाळा शिरसगाव येथील १७ वर्षांआतील मुलीच्या संघाने एक डाव राखुन विजय संपादन करत जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या विजयी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ भोगले, संघ व्यवस्थापक सिता भोये, संघ व्यवस्थापक मधुकर लहारे , पालक तसेच खेळाची जाण असणारे हिरामण टोपले यांचे शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण महाले, मुख्याध्यापक दिपक भास्कर , अधिक्षिका पुणम बावणे व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढे होणाऱ्या जिल्हा स्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
