
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२८ वा दिवस
वेदांच्या ज्ञानकांडात उपनिषदांचा समावेश असून त्याला 'वेदान्त असे नाव आहे. 'श्रुतिग्रंथांचे शिर' असेही त्यास म्हटले आहे. उपनिषदे ही अशा सामर्थ्याच्या मोठ्या खाणी आहेत. अखिल जगाला तेजस्वी बनविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे; त्यांच्या योगाने सर्व जग चैतन्यमय व सामर्थ्यशाली करता येईल, ते उत्साहाने भरून टाकता येईल. सर्व जातीच्या, सर्व पंथांच्या दीनदुबळ्या व दलित लोकांना जागृत करून ती त्यांना ललकारून सांगतील की आपापल्या पायावर उभे राहा व मुक्त व्हा. मुक्ती वा स्वाधीनता शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वाधीनता हीच उपनिषदांची घोषवाक्ये आहेत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २३ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५
★अष्टमी श्राद्ध
★ १९३२ मराठी रंगभूमी तथा चित्रपट अभिनेते काशिनाथ घाणेकर यांचा जन्मदिन.
★ १९४९ हिंदी ही भारताची राजभाषा घोषित करण्यात आली.
★ हिंदी राजभाषा दिन…
★ जागतिक प्रथमोपचार दिन…
