
ओझर: दि.१३ वार्ताहर
मविप्र समाजाचे ओझर येथील
माधवराव बोरस्ते विद्यालयात जेसीआय फाउंडेशन ओझर व माधवराव बोरस्ते विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात स्लो सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत परिसरातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धा अंडर फोर्टीन मुले मुली व अंडर सेव्हन्टीन मुले मुली या गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेतून प्रथम तीन आलेल्या स्पर्धकांना जेसीआय फाउंडेशनच्या वतीने लवकरच पारितोषिक देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार व पर्यवेक्षक दशरथ शिंदे आत्माराम शिंदे जेसीआयचे रिजनल डायरेक्टर डॉ बी पी चौधरी, इंजिनीयर जे सी दामिनी, नितीन देशमानकर, ॲड तुषार पगार, संकेत कुलदेवरे, संतोष सोनवणे, आर टी कदम आदी जेसीआयचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र डेर्ले यांनी केले. शितल हांडोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड, मनोरमा सोमवंशी उज्वला जाधव यांनी केले. आभार शिक्षक आत्माराम शिंदे यांनी मानले.
