
बोलठाण (प्रतिनिधी ) बोलठाण येथे मनोज रिंढे यांचे उपोषण सुरुच, अद्याप निर्णय नाही. बातमी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी पासून मनोज रिंढे यांचे तळमजल्यावर ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात यावे व दुकान गाळे वरच्या मजल्यावर बांधण्यात या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. परंतु अद्याप पर्यंत कुठलाही मार्ग निघाला नसून मनोज रिंढे यांची तब्येत ढसाळली असल्याने त्यांच्यावर सध्या औषधोपचार सुरू आहेत. मात्र नांदगाव पोलीस स्टेशनला जो निर्णय बोलठाण ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. तो निर्णय कायम असून यात कोणताही निर्णय होणार नाही.व उपोषण करते यांची तब्येत ढासाळली असून त्यांना दवाखान्यात हलवण्याची नितांत गरज असल्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भदाने यांनी बोलठाण येथील उपोषण स्थळे भेट दिली व उपोषण करते मनोज रिंढे यांना दवाखान्यात येण्याची विनंती केली. परंतु त्यांनी दवाखान्यात उपचारासाठी जाण्यासाठी विरोध दर्शवला असून उपोषण स्थळावरच उपचार करण्यात यावी असे उपोषण करते रिंढे यांनी बोलताना सांगितले. पोलीस निरीक्षक भदाणे यांनी सांगितले की तुमची तब्येत जास्त झाल्यास आम्हाला तुम्हाला दवाखान्यात उपचारासाठी न्यावे लागेल असे मनोज रिंढे यांना सांगितले. मनोज रिंढे यांनी बोलठाण येथे अन्नत्याग अमरण उपोषण सुरू केले असल्याने नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट दिली त्यानंतर त्यांनी. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजीच्या पत्रामध्ये म्हटले आहे की ग्रामपंचायत बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे ग्रामपंचायत संदर्भ (१) मनोज श्रीराम रिंढे बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांचे निवेदन एक सप्टेंबर 2025(२) ग्रामपंचायत बोलठाण ग्रामसभा दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी चा पारित ठराव क्रमांक 30 (३) ग्रामपंचायत बोलठाण मासिक सभा दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजीचा ठराव क्रमांक 78, (४) मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांची समक्ष करून दिलेला करारनामा दिनांक 10 एप्रिल 2023 (५) जिल्हा परिषद नाशिक यांचेकडील इमारत निर्लेखन आदेश क्रमांक जिपना/ग्रापं/ मालमत्ता/406/21 दिनांक 29 सप्टेंबर 2021 (६) उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नाशिक यांचे कडील आदेश क्रमांक जिपना/ ग्रापं/जिग्राविनि/145/23 दिनांक 6 एप्रिल 2023 (७)मा. कार्यकारी अभियंता, इवद क्रमांक 3 जिल्हा परिषद नाशिक यांचेकडील तांत्रिक मान्यता क्रमांक 919 दिनांक 27 डिसेंबर 2022 (८) जाहीर ई-निविदा प्रसारित शासन संकेतस्थळ www.mhatenders.gov वरती दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ते 8 मार्च 2023 पर्यंत प्रसारित केली आहे. (९) ग्रामपंचायत कार्यारंभ आदेश 9 जून 2023 (१० ग्रामपंचायत कार्यक्रम आदेश दिनांक 13 फेब्रुवारी 2024 (१२) दिनांक 9 नंबर 2025 रोजी उपोषण स्थळी दिलेली भेट च्या अनुषंगाने नांदगाव पंचायत समितीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना कळविले आहे की मनोज श्रीराम रिंढे एक सप्टेंबर 2025 रोजी चे निवेदनात ग्रामपंचायत बोर्डांच्या वतीने जुनी ग्रामपंचायत पाडून त्या ठिकाणी नवीन ग्रामपंचायत बांधकाम हाती घेतलेली आहे. परंतु नवीन ग्रामपंचायत कार्यालय वरच्या व खालच्या मजल्यावर दुकान, गाळे काढण्याचे नियोजन आहे. या कामासाठी 26 जानेवारी 2024 च्या ग्रामसभेत विरोध करून देखील नवीन ग्रामपंचायत तुला मजल्यावर बांधण्यात यावी व ग्रामपंचायत समोर कोणतेही दुकान गाळे बांधकाम करू नये असा ठराव मंजूर करण्यात आलेला असून सुद्धा चार दिवसापासून ग्रामपंचायतीने यामध्ये कोणताही बदल न करता ग्रामपंचायत बांधकाम तळमजल्यावर न घेता वर्षा मजल्यावर बांधकाम करण्याचा घाट घातलेला आहे. ग्रामपंचायतच्या फार मोठ्या धोरणामुळे गावातील दिव्यांग, वयोवृद्ध, महिला यांना त्रास होणार आहे व गावातील सार्वजनिक कार्यक्रम 26 जानेवारी व 15 ऑगस्ट इतर सार्वजनिक कार्यक्रम हे ग्रामपंचायत समोर होतात म्हणून संदर्भीय निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत आहे त्या प्लॅन प्रमाणेच काम सुरू केले आहे. त्यामुळे सदरचे काम तात्काळ थांबविण्यात येऊन फुलांमध्ये बदल करावा यासाठी दिनांक 8 सप्टेंबर 2025 पासून उपोषणास बसलेले आहेत (१) ग्रामपंचायत बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे जिल्हा परिषद ग्राम विकास कर्ज मंजूर करून व्यापारी गाळे तयार करणे व त्यावर ग्रामपंचायत कार्याल निर्मिती करणे याबाबत संदर्भ क्रमांक दोन नुसार ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर ठराव पारित केला आहे. तसेच संदर्भ क्रमांक तीन ग्रामपंचायत मासिक सभेवर देखील ठराव पारित केलेला आहे. (२) ग्रामपंचायत बोलठाण ग्रामसभा व मासिक सभा मध्ये ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामनिधी कर्ज घेण्याबाबतचा प्रस्ताव या कार्यालयामार्फत आपल्या कार्यालयास सादर करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायत ने संदर्भ क्रमांक 4 मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांची समक्ष सर्व ग्रामपंचायत प्रतिनिधी हे उपस्थित राहून करारनामा करून दिल्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास निधीतून कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. (३) तत्पूर्वी संदर्भ क्रमांक 5 चे आदेशान्वये जिल्हा ग्रामनिधी कर्ज मंजूर प्रकरण मंजुरी झाल्यानंतर कामास संदर्भ क्रमांक सात अन्वये मा. कार्यकारी अभियंता, इवद क्रमांक 3 यांनी तांत्रिक मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायतीने संदर्भ क्रमांक आठ अन्वये ग्रामपंचायत शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर निविदा प्रसारित करून. संदर्भ क्रमांक 9 कामास कार्यारंभ आदेश दिलेला आहे. व संदर्भ क्रमांक 10 नुसार पुनश्च कार्यारंभ आधीच दिलेला असून संदर्भ क्रमांक 11 चे पत्रान्वयी कामास मुदतवाढ देखील दिलेली आहे. (५) सदर परिस्थिती पाहता व दिनांक नऊ सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत बोलठाण येथे जाऊन दस्तऐवजाची पाहणी केली आहे तसेच उपोषण स्थळी जाऊन उपोषणार्थी यांना पाहणी केलेल्या दस्तऐवजी बाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली असून आज रोजी ग्रामपंचायत कार्यालय हे गाळे बांधकाम करून त्यानंतर त्याचे लिलावाद्वारे येणारे ग्रामनिधी उत्पन्नातून वरील ग्रामपंचायतीचे बांधकाम होणार आहे. जिल्हा ग्राम विकास निधीतून कर्ज मंजूर हे गाळे बांधकामासाठीच केले आहे असे समजून सांगण्याचा प्रयत्न केला असून उपोषणार्थी यांनी ग्रामपंचायत कार्यालय हे खालीच झाले पाहिजे नाहीतर गाड्यांचे बांधकाम करू नये व मंजूर झालेली प्रस्ताव वर ग्रामसभा बोलविण्यात यावी. जो निर्णय होईल तो मान्य करावा तोपर्यंत ग्रामपंचायतचे गाड्यांचे सुरू असलेले बांधकाम हे बंद करण्यात यावेळी असा हट्ट धरून त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला. त्यानंतर मी व ग्रामपंचायत प्रशासनाने त्यावर तोडगा पर्यायी मार्ग काढण्याबाबत विचार केला असता सुरू असलेल्या गाड्यांचे बांधकामापैकी जिन्यालगत दिव्यांगासाठी गिफ्ट बसविणे अथवा जिन्यालगतचे खालील तीन गाळे हे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कार्यालयासाठी ठेवण्यात यावी अशी चर्चा ठरले व तसा प्रस्ताव उपोषणकर्ते यांची समोर ठेवला असता त्यांनी त्याच सुद्धा नकार दिला. दोन पर्याय ग्रामपंचायत प्रशासनाने ठेवून सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका कायम ठेवत ग्रामसभा बोरवेल हट्ट धरला. आज रोजी ग्रामपंचायतने दिलेले सामाजिक कार्य व मुदतवाढ पत्र, कंत्राटदाराने सुरू केलेली काम थांबविणे हे नियमित नाही असे मत आहे. तसेच उपोषणर्थी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसभा बोलविणे व त्यानुसार निर्णय घेणे बाबतचे मार्गदर्शन होण्यासाठी नांदगाव पंचायत समितीने दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना दिलेल्या पत्रात मध्ये म्हटले असून या पत्रामध्ये उपोषणार्थी मनोज श्रीराम रिंढे यांना म्हटले आहे की दिनांक आठ सप्टेंबर 2025 रोजी पासून सुरू असलेली उपोषण बाबत वरिष्ठ कार्यालयास अवगत करून त्यांचे मार्गदर्शन मागणी केलेली असून आज रोजी आपण केलेली मागणी नियोमिचित नसल्याने व त्यावर मार्गदर्शन मागविण्यात आले आहे तरी कृपया आपले सुरू असलेली उपोषण मागे घ्यावे असे म्हटले असून मा. तहसीलदार नांदगाव, मा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे नांदगाव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की श्री मनोज श्रीराम रिंढे राहणार बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांचे दिनांक 8 सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेली उपोषण बाबतचे मागण्या ह्या नियोमोचित नसून उपोषणार्थी यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रामसभा घेण्याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचेकडून मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे. तसेच दरम्यान श्री मनोज रिंडे उपोषण करते यांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिलेला असून त्यामुळे त्यांची प्रकृती स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे तरी पुढील उचित कार्यवाही आपले स्तरावरून व्हावी असे म्हटले आहे. यावरून या बोलठाण येथे सुरू असलेल्या अन्नत्याग अमरण उपोषण संदर्भात असे सिद्ध होते की जर वरील सर्व गोष्टी होऊन देखील काही बदल करण्याचे अधिकार नांदगाव पंचायत समिती व बोलठाण ग्रामपंचायतीला आहेत तर मनोज रिंढे व ग्रामस्थ म्हणतील तसा बदल करता येत नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे. या बाबत आता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून. पुढे काय होईल याच्या प्रतिक्षेत येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
