नवकवियत्री- पूजा भास्कर ठोंबरे.
इयत्ता- आठवी माऊली माध्यमिक विद्यालय पोखरी, तालुका – नांदगाव. जिल्हा- नाशिक.

परिचय
पूजा भास्कर ठोंबरे. तसा माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. माझे वडील (भास्कर ठोंबरे) शेती करतात. आई (लंकाबाई )गृहिणी आहे. आम्ही तीन भावंडं मोठा भाऊ तुषार कॉलेजला आहे. मोठी बहीण हर्षदा ही देखील कॉलेजला आहे. मी माऊली माध्यमिक विद्यालय पोखरी मध्ये इयत्ता पाचवीपासून शिकत आहे .मला महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे सहकार्यवाह तसेच आमच्या विद्यालयाचे उपशिक्षक माझे गुरु श्री. घोडके सर ,तसेच निकम मॅडम यांचे कविता करण्यासाठी मार्गदर्शन मिळाल्यामुळे आणि त्यांच्या प्रेरणेने कविता लिखाण करण्याची आवड मला निर्माण झाली. मी या माझ्या गुरूंचे तसेच मला प्रेरणा देणारे माझी आई वडील भाऊ-बहीण तसेच मामा (लक्ष्मण गोटे)
यांचे मनापासून खूप खूप आभार मानते.
कविता
१)✍️एक स्वप्न✍️
मी काहीतरी बनले.
कोणाला तरी मारले!
सूट बूट घालून
मस्त आयटीत बसले !….||१||
लाल दिव्याची गाडी होती.
सोबतीला चार शिपाई होते.!
माझ्या मनातल वादळ,
संपता संपत नव्हते !….||२||
सगळे मला अभिनंदन
करण्यासाठी येतच होते!
पण डोळे उघडून पाहिले,
तर ते माझे एक स्वप्न होते!…||३||

२)✍️लेखन आणि जीवन 🌎
असं थोडसं लिहावं वाटतं,
जे सगळ्यांच्या काळजाला भिडेल.!
असं थोडं जगावं वाटतं,
जे माझ्या मनाला पटेल.!
मी काहीतरी लिहिल्याने ,
सगळे होतात भाऊक.!
पण मी हे का लिहिते,
आहे का त्यांना ठाऊक?
लिहिते मी कविता,
माझं जीवन घडवायला.!
होईल का थोडी मदत,
खोटं जग बदलायला?

३)✍️ आयुष्य ✍️
एका चुकीने होईल असं ही नसतं!
देवानेही ते केलेलं नसतं ,
आपलं आपण ठरवायचं असतं!
ते आपलं आयुष्य असतं! …
झालं गेलं सगळं विसरायचं असतं!
होणार आहे ते टाळायचं असतं!
आपल्याला नीट जगायचं असतं!
ते आपलं आयुष्य असतं!
रोजचा दिवस हा नवाच असतो!
रोजचा सूर्य हा उगणारच असतो!
आपलं आपण कसं जगायचं !
आपलं आयुष्य आपणच ठरवायचं!
आयुष्याचा खेळ आहे हा!
असं म्हणून चालणार आहे का?
आपल्याला आपलं आयुष्य जगायचं असतं!
आपल्यालाच आपलं आयुष्य ठरवायचं असतं.!…….

४)🌎जीवन जगता आलं पाहिजे🌎
रंग सावळा असला म्हणून काय झालं ?
जीवनात रंग भरून जगता आलं पाहिजे!
जीवनात दुःख असलं म्हणून काय झालं.?
चेहऱ्यावर आनंद ठेवून जगता आलं पाहिजे.!
दुसऱ्याचं मन दुखावल्यापेक्षा स्वतःच्या मनाला शिकवलं पाहिजे.!
जीवनात दुःख असलं म्हणून काय झालं.?
चेहऱ्यावर आनंद ठेवून जगता आलं पाहिजे.?
देवाने सर्व काही दिलं.!
असं समाधानी मन ठेवून जगलं पाहिजे.!
जीवनात दुःख असलं म्हणून काय झालं.?
चेहऱ्यावर आनंद ठेवून जगता आलं पाहिजे.!
मनात कितीही रुसवा असला तर काय झालं.? सगळ्यांशी आपुलकीने बोललं पाहिजे.!
जीवनात दुःख असलं म्हणून काय झालं.?
चेहऱ्यावर आनंद ठेवून जगता आलं पाहिजे.!

