
सिन्नर ( प्रतिनिधी ) २० मार्च २०२५संविधान सभा सदस्य जयपालसिंह मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सिन्नर येथे महामिञ परिवार , आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संघटना यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात जयपालसिंह मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. या प्रसंगी महामिञ दत्ता वायचळे म्हणाले की जयपालसिंह मुंडा हे राजनितिज्ञ,लेखक,पञकार,संपादक,शिक्षणतज्ञ,समाज अभ्यासक होते.ते १९२५ मध्ये ‘ऑक्सफोर्ड ब्लू’ हा किताब मिळवणारे हॉकी चे एकमेव आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. १९२८ ला ओलिंपिकमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली हॉकीचं भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं.आदिवासी समाजाच्या समस्यांची जाण असलेले जयपालसिंह मुंडा हे १९३८ मध्ये आदिवासी महासभेचे अध्यक्ष झाले. व त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी बिहार राज्यातून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी केली.

.जल जमीन जंगल यावर पहिला अधिकार आहे यासाठी आदिवासींमध्ये जनजागृती केली.आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातुन खासदार होऊन संविधान सभा चे सदस्य बनले व जल जमीन जंगल यावर आदिवासींचे हक्क अधिकार अभादित रहावे यासाठी संविधान सभेत आवाज उठवून संविधानात तरतूद करण्यासाठी भाग पाडले. संविधान निर्मिती साठी त्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलं.त्यांच्या महान कार्याला आदिवासी समाज कधीच विसरू शकणार नाही. संविधान निर्मिती साठी योगदान देणारे संविधान सभा सदस्य जयपालसिंह मुंडा यांना विनम्र अभिवादन!.. या कार्यक्रमाचे सुञसंचलन रुपेश मुठेअध्यक्ष महामिञ दत्ता वायचळे प्रास्थाविक विजय मुठे,तर आभार किरण मुठे यांनी मानले.या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,मा.नगरसेवक रुपेशभाऊ मुठे एसी टी कामगार सेनेचे नेते देवाभाऊ सांगळे,आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे किरण मुठे,रमेश गोंदके मनोहर सोनवणे, ज्ञानेश्वर शिरसाठ, सचिन कटारी,ऋषी नवाळे, अभिषा वायचळे,आरव वायचळे अदि उपस्थित होते.
