
*नाशिक ( प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेपसिटी आणि रेडिओ विश्वास90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने, “आत्मन- शोध स्वतःचा” अंतर्गत कु.आर्यन धस या युवकाच्या यशोगाथेवर मुलाखत शनिवार 22मार्च , संध्याकाळी ५.३० वाजता आयोजित केली आहे.डोळ्यांच्या आजाराने अचानक झालेल्या दुर्धर दृष्टीदोषावर मात करत आयआयटी रुरकी येथे प्रवेश मिळवला, ४००० विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या पाचात येत आदित्य बिर्ला स्कॉलरशिप तसेच इस्रो, एबीबी व जर्मनी येथे निवड अशा प्रेरणादायी आणि उत्कंठावर्धक प्रवासावर मुलाखत विश्वास को-ऑप बँक, मॅनेजमेंट व ट्रेनिंग सेंटर,सावरकर नगर, नाशिक येथे होत आहे. सदर मुलाखत स्पर्धा परीक्षा, जेईई तयारी करणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आवर्जून उपस्थित रहावे.असे आवाहन करण्यात आले आहे.

