
मखमलाबाद विद्यालयात विशाखा समिती व सखी सावित्री* समिती अंतर्गत अरुहील सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मुलींच्या आरोग्य व स्वच्छता जागृती कार्यशाळेप्रसंगी मुलींना मार्गदर्शन करताना संचालिका रुद्रानी देवरे व उपस्थित मान्यवर
मखमलाबाद (वार्ताहर) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे विशाखा समिती व सखी सावित्री समिती अंतर्गत अरुहील सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे मुलींसाठी “आरोग्य व स्वच्छता जागृती कार्यशाळा” संपन्न झाली.सदर कार्यशाळेसाठी व्यासपीठावर अरुहील सोल्युशन संचालिका रुद्रानी देवरे आणि त्यांच्या सहकारी अश्विनी महाले उपस्थित होत्या.याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे,ज्येष्ठ शिक्षिका स्वाती होळकर सुनिता उशीर उपस्थित होते.अतिथी परिचय विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय हांडगे यांनी करून दिला.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर यांनी अतिथींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शक वक्ता म्हणून संवादरूपी चर्चासत्रात उत्कृष्टपणे सहभागी होऊन आरोग्य जागरूकता विषयावर वक्ता म्हणून लाभलेल्या रुद्रानी देवरे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन विद्यालयातील मुलींना मिळाले. व्यायामाचे फायदे,योग्य आहार, मासिक चक्र याविषयी बेसिक माहिती विद्यार्थिनींना मिळाली. मुलींनी नियमित व्यायाम करून योग्य आहार घ्यावा व आनंदी जीवन जगावे असेही त्यांनी शेवटी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सुनिता उशीर यांनी तर आभार प्रदर्शन योगिता मोगल यांनी केले.कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षिका स्वाती होळकर, अनुपमा नाईकवाडे,अनुपमा पवार तसेच सर्व महिला शिक्षिका व इयत्ता आठवी ते दहावीच्या मुली उपस्थित होत्या.
