
सिन्नर (प्रतिनिधी) – आदिवासी युवा फाऊंडेशन महाराष्ट्र तर्फे लोकनेते माणिकराव शिवाजीराव कोकाटे जीवनगौरव पुरस्कार तसेच आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कै. सौ. अंजनाबाई सूर्यभानजी गडाख सभागृह, एस. जी. शैक्षणिक संकुल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मा. आण्णासाहेब गडाख (अध्यक्ष, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर) यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. विजयजी बागुल (गटशिक्षणाधिकारी, सिन्नर), मा. नंदकिशोरजी गायकवाड (चेअरमन, दि. रयत को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा) तसेच मा. विजय आप्पा गडाख, मा. दौलतराव मोगल, मा. भोये आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्य अतिथी मा. सिमंतीनीताई कोकाटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवून समाजाला दिशा देतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आदिवासी युवा फाऊंडेशन राबवत असलेला हा उपक्रम मोठ्या अभिमानाचा आहे.”अध्यक्षीय मनोगतात मा. आण्णासाहेब गडाख यांनी शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व समाजनिर्मितीतील योगदानाचे कौतुक केले.तर मा. नंदकिशोरजी गायकवाड यांनी आदिवासी युवा फाऊंडेशन करत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक करत, या कार्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.या वर्षी प्रथमच जीवनगौरव पुरस्काराला “लोकनेते माणिकराव शिवाजीराव कोकाटे जीवनगौरव पुरस्कार” असे नामकरण करण्यात आले. या पुरस्काराने सौ. गीता वसंत चौधरी (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका), श्री. एकनाथ आनंदा खैरनार (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), श्री. गंगाधर आप्पाजी कोरडे (सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक) व श्री. दिलीप कडवे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांचा सिमंतीनीताई कोकाटे यांच्या हस्ते सन्मान झाला.आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने श्री. एस. टी. पांगारकर व श्री. सलीम लतीफभाई चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.क्रीडा शिक्षक पुरस्काराने श्री. अनिल ढवळा झडे, पै. प्रवीण पंढरीनाथ पाळदे, श्री. माणिक तबाजी गीते, श्री. योगेश वाळू शिंदे, श्री. दशरथ लक्ष्मण मेंगाळ, श्री. भाऊसाहेब वामनराव सानप, श्री. संभाजी रंगनाथ मुन्तोडे व श्री. विलास मोरे यांचा गौरव झाला.तर आदर्श शिक्षक पुरस्काराने सौ. स्मिता अशोक पाटोळे, श्री. उत्तम मुरलीधर भोये, श्री. गोरक्षनाथ अर्जून गरड, श्री. दिपक भालेराव, श्री. विकास गुंजाळ, श्री. बबन डगळे, सौ. सोनाली खालकर, सौ. सुरेखा शेळके, श्री. अंकुश सहाणे, सौ. कल्पना वाजे व सौ. रेश्मा शिवदास डावरे यांचा सिमंतीनीताई कोकाटे यांच्या हस्ते गौरव झाला.यावेळी पुरस्कारार्थींमध्ये श्री. दिलीप कडवे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) व डॉ. कल्पना वाजे यांनी आपल्या भावना व्यक्त करत, फाऊंडेशनच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सोहळ्याचे प्रास्ताविक देवराम खेताडे यांनी करून फाऊंडेशनच्या शैक्षणिक व सामाजिक कामाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रविण सोमवंशी यांनी तर आभार प्रदर्शन जनार्दन खेताडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष विठ्ठल खोकले, सचिव पांडुरंग मेंगाळ, संस्थापक देवराम खेताडे, शरद लहांगे, जनार्दन खेताडे, विक्रम कवटे,अनिल जाधव, ऋषीकेश चव्हाण, गणेश गुंबाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
