
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२७ वा दिवस
अतएव, कर्मयोग ही निःस्वार्थपरता व सत्कर्म यांच्या द्वारा मुक्तिलाभ करून घेण्याची एक विशिष्ट नैतिक आणि धार्मिक प्रणाली होय. कर्मयोग्याचा कोणत्याही प्रकारच्या धर्ममतावर विश्वास असण्याची गरज नाही. फार काय पण प्रत्यक्ष ईश्वरावरही त्याचा विश्वास नसला तरीसुद्धा काहीच अडावयाचे नाही. तो आत्म्याचे अनुसंधान करो वा न करो, कोणत्याही प्रकारचे तात्त्विक चिंतन करो वा न करो, कशानेच काही बिघडणार नाही. त्याच्यासमोर निःस्वार्थतेची प्राप्ती हे त्याचे स्वतःचे असे एक विशिष्ट ध्येय असते, आणि ते त्याला स्वतःच्या प्रयत्नांनीच प्राप्त करून घ्यावयाचे असते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २२ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद वद्य /कृष्ण ६/७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५
★ सप्तमी श्राद्ध
★ ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती
★ १९२९ लाहोर कटातील क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांचा स्मृतीदिन.
★ १९३२ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्मदिन.
