
सिन्नर प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी ):- वडगाव सिन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर कचरू खुर्चे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक पात्रता म्हणजेच सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात यश मिळविले आहे.एकलहरे येथील मातोश्री शिक्षण महाविद्यालयातून त्यांनी यश मिळवले. त्यांना प्राचार्य सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी यश मिळवले आहे .त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहेत .खुर्चे यांचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे ,प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ .विजय बागुल ,शिक्षण विस्ताराधिकारी कैलास सांगळे ,केंद्रप्रमुख विजय निरगुडे आदींसह शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी कौतुक केले आहे.
