
नाशिक (प्रतिनिधी )स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे. चौहान माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवसानिमित्त काव्यगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली .यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी, परीक्षीका अलका चंद्रात्रे,पर्यवेक्षक कीर्तीकुमार गहाणकरी व्यासपीठावर उपस्थित होते. सदर काव्यगायन स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी नीम, बूंदे, बसंती हवा, नदी कंधे पर, फूल और कांटे व बंदर का धंधा यासारख्या कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. परीक्षिका चंद्रात्रे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्व सांगून स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर केला. इयत्ता पाचवीतील ड तुकडीतील विद्यार्थी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.इयत्ता ६वी आणि ७वी तील ड तुकडीतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.मुख्याध्यापिका यांनी विजेत्या वर्गाना फिरती ढाल देऊन त्यांचे अभिनंदन केले. जितेंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व परीक्षकांचे आभार मानले. हेमांगी खैरनार यांनी परीक्षकांचा परिचय करुन दिला. शाळेतील सर्व शिक्षकांनी हिंदी दिवस कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
