
सिन्नर ( प्रतिनिधी)महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात जागतिक चिमणी दिवस निमित्ताने विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेंद्र मिठे,एकनाथ माळी(उपप्राचार्य उच्च माध्य.),प्रमोद काकडे,राजेंद्र खर्जे,किरण मिठे यांच्या उपस्थितीत हरित सेना प्रमुख कुंदे बी.टी.यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण संतुलनाचा पहिला धोका सांगणारी चिमणी आहे.नैसर्गिक परिसंस्थेतील चिमणी एक भाग आहे असे सांगितले तसेच आधुनिकीकरण गगनचुंबी इमारतींत होणारी वाढ,मोबाईल फोन टॉवर्स या सर्व गोष्टींमुळे चिमणी अडचणीत आली आहे

म्हणूनच चिमणी जगायला हवी याची जाणीव होऊन त्यांचे घरटे,अन्न,निवारा तसेच निसर्गप्रेमींना चिमण्यांबद्दल प्रेम आणि काळजी घेण्याबाबत राजेंद्र मिठे यांनी सांगितले.सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख सविता काठे यांनी केले तर आभार क्रीडाशिक्षक सागर नन्ने यांनी मानले.

