
सिन्नर ( प्रतिनिधी ) चांडक कन्या विद्यालय येथे झालेल्या तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत महात्मा फुले विद्यालयाच्या संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा मुख्य विषय घेऊन या संघाने
नाटिका सादर केली. तालुकास्तरीय स्पर्धेत या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. या संघाला श्रीमती माधुरी वरंदळ यांनी मार्गदर्शन केले.
सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नामदेव लोंढे साहेब तसेच संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री नामदेव लोणारे साहेब आणि विद्यालयाचे प्राचार्य मधुकर देशमुख सर व विद्यालयाच्या प्रभारी पर्यवेक्षिका सविता काठे मॅडम या सर्वांनी विजयी खेळाडूंचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वरंदळ मॅडम यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
