
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२६ वा दिवस
गीता आपल्याला शिकविते - आध्यात्मिकता प्राप्त करून घेण्यासाठी या जीवनातच आपल्याला लढा दिला पाहिजे. म्हणून जीवनापासून आपण पळ काढता कामा नये. उलट त्याच्यापासून जे काही मिळविता येईल ते मिळविण्यासाठी झटले पाहिजे. उच्च गोष्टींच्या लाभासाठी केल्या जाणाऱ्या संघर्षाचे गीता हे प्रतीक असल्यामुळे ती युद्धक्षेत्रावर सांगितली गेली ही घटनाच मोठी काव्यात्मक आहे. एका पक्षाचा नेता जो अर्जुन त्याचे सारथ्य करीत असलेले श्रीकृष्ण अर्जुनाला दुःखी न होण्याचा, मृत्यूला न भिण्याचा उपदेश करतात. याचे कारण हे की, आत्मा अमर आहे व जे काही परिवर्तनशील आहे ते मानवाचे खरे स्वरूप असू शकत नाही हे त्यांना माहीत होते. एकामागून एक अशा अनेक अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला तत्त्वज्ञान व धर्म यांमधील उच्च सत्यांचा उपदेश करतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २१ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५
★ षष्ठी श्राद्ध
★ १६६६ आग्रा येथून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज राजगड येथे सुखरुप येऊन पोहोचलेत.
★ १९१२ स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राजकीय नेते, प्रखर भ्रष्टाचाराचे विरोधक व इंदिरा गांधी यांचे पती फिरोज जहांगीर गांधी यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
