
नाशिक (प्रतिनिधी ) नासिक मधील नामांकित असलेली संस्था प्राचार्य ग.वि. अकोलकर मानसिक क्षमता शोधन संस्थेचा श्रीमती मुग्धा जोशी उपक्रमशील मातृभाषा शिक्षक पुरस्कार यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नाशिक चे उपमुख्याध्यापक श्री.राजेंद्र बाळासाहेब सोमवंशी सर यांना जाहीर झाला आहे.राजेंद्र सोमवंशी हे दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट ,नासिक या संस्थेत ३१ वर्षापासून कार्यरत असून यापूर्वीही त्यांना विविध संस्थांनी जिल्हा व राज्य पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.बालसाहित्यिक म्हणून सुप्रसिद्ध असलेले कवी राजेंद्र सोमवंशी यांचे दोन बालकविता संग्रह प्रसिद्ध असून “गम्माडी-गंमत ” व ” गीत नवे गाऊ ” या बालकाव्यसंग्रहांना अनेक जिल्हा व राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. दिल्ली येथे संपन्न झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजेंद्र सोमवंशी यांना निमंत्रित कवी म्हणून सन्मान मिळाला आहे.शालेय पाठ्यपुस्तकातील कवी लेखक व इतर मान्यवर कवी लेखकांची थेट फोनवरून संवाद साधत विद्यार्थिनींना ” थेट भेट कवींशी ” या उपक्रमाद्वारे विद्यार्थिनींची साहित्यिकांशी भेट घडवून आणली आहे.विद्यार्थिनींना अभिव्यक्त होण्यासाठी मा.मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राबविलेल्या ” माझा फळा ” व ” अक्षरबाग” या उपक्रमांची दखल संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाशजी वैशंपायन व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.बालकवितांच्या व बालगीतांच्या माध्यमातून अनेक शाळा व कवितांच्या माध्यमातून अनेक महाविद्यालयातून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी ” गीत नवे गाऊ ” आणि “गप्पा-टप्पा आणि कविता ” असा उपक्रम राबवताना भाषेची गोडी वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाशजी वैशंपायन , उपाध्यक्ष मा .प्रभाकर कुलकर्णी ,स्कूल कमिटी चेअरमन मा.रमेश महाशब्दे, सेक्रेटरी मा.हेमंत बरकले , शाळेच्या अधीक्षिका सौ.मीना वाळुंजे मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचें अभिनंदन केले आहे.
