
वसंत गोसावी, (सिन्नर प्रतिनिधी) :शिक्षक म्हणजे फक्त ज्ञानदान करणारे नाहीत तर विद्यार्थ्यांच्या मनामनात प्रेरणेची ज्योत पेटवणारे मार्गदर्शक असतात. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला नुकताच मानाचा सन्मान मिळाला आहे.मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विज्ञान विषयाच्या शिक्षिका सौ. प्रिती रामराव पवार (प्रिती अमोल खैरनार) यांना लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवाभावी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित संस्थेमार्फत दिला जाणे हे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.हा सन्मान सोहळा गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथे दिमाखात पार पडला. यावेळी पुरस्काराचे वितरण लायन्स क्लब अध्यक्ष उद्योजक बबन वाजे, हेमंत नाना वाजे, डॉ. विजय लोहारकर, मनीष गुजराथी, डॉ. गणेश पाटील, अपर्णा क्षत्रिय, सचिव जयवंत काळे, खजिनदार प्रशांत शिंदे, प्राचार्य एन. यू. पाटील तसेच प्रमुख पाहुणे प्राचार्य सानप यांच्या शुभहस्ते झाले.याप्रसंगी सौ. प्रिती मॅडम म्हणाल्या, “अशा पुरस्कारामुळे काम करण्याची उर्जा व उत्साह दुप्पट होतो. विद्यार्थ्यांसाठी आणखी काही वेगळे करण्याची प्रेरणा मिळते.”सौ. प्रिती पवार म्हणजेच “मूर्ती लहान पण कीर्ती महान”. विज्ञान प्रदर्शन असो वा परिपाठ, शालेय उपक्रम असो वा विद्यार्थी प्रोत्साहन – पवार मॅडम नेहमीच अग्रस्थानी दिसतात.या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, संचालक कृष्णाजी भगत, मुख्याध्यापक रायते सर, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवर्ग, प्रा. जयंत महाजन, प्रा. संजय पवार, सौ. सुनिता पवार, सौ. स्वाती संजय डेरे, कीर्ती पवार, सौ. लता पवार, मिलिंद पवार, सुकदेव दादा पवार, शिवाजी दादा पवार, सोनांबे पंचक्रोशीतील नागरिक, सिन्नर सह्याद्री संचालक सुदाम शिंदे, मधुकर डावरे तसेच असंख्य सिन्नरकरांनी मन:पूर्वक अभिनंदन केले. “शिक्षक हेच खऱ्या अर्थाने समाजाचे दिशादर्शक आहेत” हे वचन सौ. प्रिती पवार मॅडमनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
