
सिन्नर (प्रतिनिधी):मातोश्री चांडक कन्या, सिन्नर विद्यालयातील परिश्रमी व गुणवंत शिक्षिका सौ.नीलिमा दुसाने यांना रोटरी क्लब ऑफ नाशिक (ग्रेप सिटीचा ) जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार( *NATION* *BULID AWARD* ) नुकताच जाहीर झाला यामुळे विद्यालयाचा मान उंचावला आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाचा हा सन्मान असल्याचे मत मुख्याध्यापिका सुनीता कर्डीले यांनी व्यक्त केले तर आपल्या कामात सातत्य ठेवले तर कामाची दखल नक्की घेतली जाते असे मत पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांनी व्यक्त केले या विशेष यशाबद्दल शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. गोरक्ष सोनवणे, स्टाफ सेक्रेटरी उत्तम भोये,सचिव राजहंस माळी सहसचिव सौ. जयश्री सोनवणे, खजिनदार दिपक गायकवाड, सहखजिनदार कोमल लहाने यांसह विद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग व पालक-शिक्षक संघाचे सदस्य राजेंद्र पाबळे, सुनील कुऱ्हे, पोपट इलग, सचिन गोळेसर, गुलाब कांदे, गायत्री कर्नाटकी, सविता ठोक, स्मिता क्षत्रिय, सुरेखा पाटील, कावेरी गुंजाळ, मंजुषा आहेर, माया सोनवणे, रेखा वाघ, रेश्मा जहागीरदार, रोहिणी करंजकर आदींनी सौ.दुसाने यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
