
मखमलाबाद विद्यालयात कर्मवीर डी.आर. भोसले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करताना प्राचार्य संजय डेर्ले.याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मविप्र संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावबहादूर डी.आर.भोसले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले,ज्येष्ठ शिक्षिका भाग्यशाली जाधव,बेबी जाधव,संगीता कुशारे,तुकाराम तांबे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.इयत्ता ९ वी ब ची विद्यार्थिनी कु.स्वराली परदेशी हिने कर्मवीर डी.आर.भोसले यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षिका योगिता कासार व चैताली पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की कर्मवीर डी.आर.भोसले यांना रावबहादुर ही पदवी प्राप्त झालेली होती.

सरकारी नोकरी करत असतानाही त्यांनी सत्यशोधक समाजाच्या चळवळीत सहभाग घेतला.राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानी प्रभावित होऊन कर्मवीर डी.आर.भोसले यांनी शिक्षणाचा प्रसार केला,तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोठा हातभार होता.त्यांनी स्त्रियांचे शिक्षण,सहकार चळवळ,शेतकऱ्यांचे प्रबोधन,गरीब व गरजूंना सातत्याने मदत अशा प्रकारच्या विविध कार्यांमध्ये भरीव कामगिरी करत समाजसेवा केली. ज्येष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे व कु.तेजश्री पवार यांनी सूत्रसंचालन व कु.मानसी कदम हिने आभार प्रदर्शन केले.इयत्ता ९ वी ब च्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका चैताली पिंगळे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
