
नाशिकरोड:- पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात नाशिकरोड येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे (बिटको) हॉस्पिटलमधील एकात्मिक सल्ला आणि चाचणी केंद्रातील समुपदेशक सुजाता जेजुरकर यांनी आरोग्यविषयक सखोल मार्गदर्शन केले. वैष्णवी पाटील आणि निर्मला रसाळ यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मुंबई येथील महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या वतीने प्रशिक्षण संवेदीकरण शिबिरांतर्गत विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात समुपदेशक सुजाता जेजुरकर यांनी एड्स, टीबी, गुप्तरोग अशा विविध आजारांबद्दल सखोल माहिती दिली. कोणताही आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दलही उदबोधनही केले. शिक्षिका आशा चौधरी आणि सविता सानप-घुगे यांनी स्वागत केले.
