
साकोरा ( प्रतिनिधी) पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचा २७ वा वर्धापन दिन सोहळा पेङकाई माता , सरस्वती प्रतिमा पूजन , दिप प्रज्वलन करुन संपन्न झाला कार्यक्रमा संपन्न झाला इयत्ता ५ वी च्या विद्यार्थीनी यांच्या स्वागत् गीता ने झाली .यावेळी संस्थेचे सचिव राजेद्र बोरसे , उपाध्यक्ष भारत बोरसे , खदिनदार रविद्र बोरसे सर विलासबापू बोरसे , रामकृष्ण बोरसे ,संजय बोरसे , योगेश पाटील संचालक उपस्थितीत होते . यावेळी सर्वानचा विद्यालयातील शिक्षक यांच्या कङून शाल श्रीफळ गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत् केले . तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापक नितीन ठुबे सर व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लांबबर्ङी शाळेचे शिक्षक उमेश बोरसे सर यांचे संस्था व विद्यालयाकङून विशेष सन्मान करण्यात आला . विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी यांना विशेष प्रमाणपञ व बक्षिस देऊन प्रोत्साहन देण्यात आले .कार्यक्रमा चे प्रास्ताविक मुख्याध्यापक व संचालक योगेश पाटील यांनी केले. संस्थेच्या प्रगती बाबत मनोगत व्यक्त केले . क्षीरसागर सर यांनी संस्थेची वाटचाल व विद्यार्थी हितासाठी पुढील ध्येय स्पस्ट केले .प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी योगेश निकम संस्थेच्या गुणवत्ते बाबत सांगताना संस्कारातून शिक्षण दिले जाते ते विद्यार्थी यांनी आत्मसात करावे हे सांगतिले व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी योगेश निकम व शिवसेना युवा नेते संजय लाला अहिरे यांनी मिळून ५१ हजार रुपये देणगी धनादेश मुख्याध्यापक व संचालक मंङळा कङे सुपूर्द केला. कार्यक्रमा चे अध्यक्ष विलासबापू बोरसे यांनी संस्था सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , क्रिङा , विज्ञान यात देत असलेले योगदान सांगतिले तसेच विविध बक्षीस विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी घोषित केले. तसेच जागर लोककलेचा कार्यक्रम माजी विद्यार्थी युवा शाहीर प्रविण गांगुर्ङे व प्राध्यापक प्रविण जाधव , युवा शाहीर कृष्णा शिरसाठ यांनी जोरदार सादर केला .विद्यार्थी मंञमुग्ध होऊन आनंद घेत होते .सर्व कलावंत यांचे स्वागत् मुख्याध्यापक योगेश पाटील व शिक्षक भाबङ सर यांनी केले. कार्यक्रमा चे सुञसंचलन श्री सुरसे एस जी यांनी तर आभार पूनम बोरसे यांनी केले. यावेळी शिक्षक , शिक्षकेत्तर वृंद विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होता. विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देऊन सांगता झाली.
