
..मुंबई: दि.२०( वार्ताहर )जागतिक दर्जाचे वास्तुशिल्प व कला स्थापत्य तसेच वस्तुसंग्रहालय माहिती प्रशिक्षण कार्यशाळा मुंबई येथे पार पडली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने ओझर येथील ग्रामीण शिक्षक प्रशिक्षणास माधवराव बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक नरेंद्र डेरले, महेंद्र डांगले उपस्थित राहुन मुंबईतील शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्राचीन शिल्पकला स्थापत्य कार्यशाळा संपन्न झाली.

समाजातील।प्रत्येक घटकाला विशेषतः विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध आणि संपन्न ऐतिहासिक वास्तूविषयी माहिती अवगत व्हावी आणि उपलब्ध अगदी बाराव्या – तेराव्या शतकातील ऐतिहासिक वास्तू प्रत्यक्ष बघायला मिळाव्यात अनुभवता याव्यात आणि अध्यापनात या सर्वांचा कृतिशील वापर व्हावा या उदात्त हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची माहिती देण्यात आली. ज्याचे मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया, हे मुंबई येथील एक संग्रहालय आहे जे प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करते. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतातील ब्रिटिश राजवटीत, प्रिन्स ऑफ वेल्स (नंतर जॉर्ज पाचवा, राजे किंग युनायटेड किंग्डम आणि भारताचा सम्राट) यांच्या भेटीच्या स्मरणार्थ, सरकारच्या मदतीने बॉम्बे नावाच्या शहरातील प्रमुख नागरिकांनी त्याची स्थापना केली.

. हे दक्षिण मुंबईच्या मध्यभागी गेटवे ऑफ इंडिया जवळ असून १९९८ मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या नावावरून संग्रहालयाचे नामकरण करण्यात आल्याची माहिती प्रशिक्षणार्थी शिक्षक नरेंद्र डेरले यांनी दिली. तीन दिवस सुरू असलेले प्रशिक्षण कार्यशाळा सुरळीत संपन्न झाली.

