
नांदगाव ( प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बहुमताच्या जोरावर भाजप सरकारने जन सुरक्षा हा कायदा बहुमताने पास करून घेतला आहे या कायद्यामुळे अनेक नागरिकांच्या लोकशाहीने दिलेल्या अधिकाराची हक्कांची पायमल्ली होऊन जनतेवर अन्याय होणार आहे त्यामुळे कायदा रद्द करावा या मागणीसाठी नांदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने ( ठाकरे गट) तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकशाही विरोधी घटनाविरोधी लोकांवर अन्याय अत्याचार करणारा हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे शासनाने तसेच प्रशासनाने लोकांना संबंधित जाचक कायद्यापासून दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात शेवटी करण्यात आली आहे यावेळी शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, श्रावण आढाव, दिलीप नंद, संतोष शिंदे, मच्छिंद्र वाघ ,साहेबराव गायकवाड, निवृत्ती गुंजाळ, बबन उगले ,यादव मोरे, गौतम पवार, मच्छिंद्र पवार, वसंत सोनवणे ,दामू सापटे ,दत्तू सोळंके, मच्छिंद्र वाकचौरे, आदीं नांदगाव तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
