
नाशिक:- (प्रतिनिधी ) चतुरस्र साहित्यिक आणि अभिनेते राजेंद्र उगले यांच्या मातोश्री दिवंगत दगुबाई बापूराव उगले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ठाणे येथील अष्टगंध प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या कवी राजेंद्र दगुबाई बापूराव उगले यांच्या ‘आई कधीच नसते मरत!’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी (दि.१३) सायंकाळी ६ वा.होणार आहे._* *_सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या सोहळ्यात ज्येष्ठ समीक्षक आणि मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.कवी आणि गीतकार प्रकाश होळकर,विवेक उगलमुगले,प्राचार्य लक्ष्मण महाडिक,साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी तथा तहसीलदार आबा महाजन,प्रकाशक संजय शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन हभप बापूराव महाराज उगले,उगले परिवार,कादवा शिवार,गिरणा गौरव,वैशाली प्रकाशन,अष्टगंध प्रकाशन,पंलकमं,सपान,राऊ मित्र परिवाराने केले आहे._*
