
वसंतनगर ( प्रतिनिधी ) श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित व्ही एन नाईक कनिष्ठ महाविद्यालय वसंत नगर येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळी व तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेच्या मैदानी खेळात यश संपादन केले नाशिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय ओशो बॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी कृष्णा संतोष वाघ हा प्रथम विजेता ठरला व त्याची विभागीय पातळीवर निवड झाली

मांडवड येथे शालेय तालुकास्तर कबड्डी स्पर्धेत महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला मनमाड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 19 वर्षांखालील 60 किलो वजनी गटात महाविद्यालयाचा विद्यार्थी कुणाल काशिनाथ चव्हाण हा उपविजेता ठरला तसेच सेंट जेवियर्स हायस्कूल मनमाड येथे आयोजित तालुका पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेत 19 वर्षाखालील कमलेश विश्वास राठोड हा विद्यार्थी उपविजेता ठरला नांदगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत 19 वर्षांखालील महाविद्यालयाने सर्वच मैदानी खेळात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविले यात ओम दादाभाऊ चोरमले 100 मीटर व 200 मीटर धावणे प्रथम व ईश्वर भागवत हा विद्यार्थी 400 मीटर धावणे प्रथम व लांब उडी खेळात प्रथम प्रवीण मोतीलाल चव्हाण 400 मीटर धावणे द्वितीय अक्षय भागीनाथ राऊत हा विद्यार्थी 800 मीटर प्रथम व लांब उडि द्वितीय तुषार गोरखनाथ राठोड 800 मीटर द्वितीय व 4 x 100 रिले शर्यत विजेता कमलेश विश्वास राठोड 1500 मीटर धावणे प्रथम विजेता कुणाल काशिनाथ चव्हाण पंधराशे मीटर धावणे द्वितीय गोळा फेक प्रथम व 4×100 विजेता श्याम गोरख राठोड 3000 मीटर धावणे प्रथम आर्यन अनिल राठोड 3000 मीटर धावणे द्वितीय व 5000 मीटर धावणे द्वितीय विजेता अर्जुन पिंटा राठोड क्रॉस कंट्री 5000 मी. प्रथम तसेच ओम नवनाथ पवार भालाफेक द्वितीय एकोणावीस वर्षांखालील संघामध्ये रिले शर्यतीत श्याम गोरख राठोड अक्षय भागिनाथ राऊत कुणाल काशिनाथ चव्हाण व ईश्वर भागवत व तुषार गोरखनाथ राठोड विजेते ठरले तर 19 वर्षांखालील मुलींमध्ये 4×100 रिले शर्यतीत वैष्णवी राजेंद्र घरमोडे परी का संतोष राठोड मुस्कान मोईद्दीन शेख वैष्णवी कैलास गायकवाड स्वामिनी संतोष पवार या विद्यार्थिनी विजेत्या ठरल्या 19 वर्षाखालील मुलींनी पुढील यश संपादन केले मुस्कान मोईद्दीन शेख 100 मीटर धावणे प्रथम व गोळा फेक प्रथम वैष्णवी राजेंद्र घरमोडे 1500 मीटर धावणे प्रथम व 200 मीटर धावणे प्रथम परी का संतोष राठोड 3000 मीटर धावणे प्रथम व गोळा फेक द्वितीय विजेती17 वर्षाखालील मुलींमध्ये स्वामिनी संतोष पवार तीन हजार मीटर धावणे प्रथम सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री ठाणगे के एस यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले

सर्व यशस्वी खेळाडूंची श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष माननीय श्री एस जी राठोड साहेब मार्गदर्शक माननीय श्री जे जी राठोड साहेब सचिव माननीय श्री एस एस राठोड साहेब सर्व संचालक मंडळ प्राचार्य उप प्राचार्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
