
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८५१ वा दिवस प्रथम एखादे वाद्य शिकायचे झाले तर त्याच्या तारा सावकाश छेडाव्या लागतात. असे करता करता बोटांना हळूहळू सवय होते. मग प्रत्येक तारेच्या कंपनाकडे लक्ष न देता आपण सफाईने वाद्य वाजवू लागतो. तसेच आजची आपली सहज कर्मे ही आपण पूर्वी जाणीवपूर्वक केलेल्या कर्माचा परिपाक असतात. स्वामी विवेकानंद… *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २९ फाल्गुन शके १९४६*
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ गुरुवार दि. २० मार्च २०२५ ★ एकनाथ षष्ठी, पैठण यात्रा
★ १७२७ गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडणारे, भौतिक शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ सर आयझेंक न्यूटन यांचा स्मृतिदिन.
★ १९१६ अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा सिध्दांत प्रसिद्ध केला.
★ १९२० मराठी साहित्यीक, नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्मदिन१९५६ मराठी नवकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचा स्मृतीदिन
★ जागतिक चिमणी दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*

