
डुबेरवाडी ( प्रतिनिधी ) आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची २३४ वी जयंती डुबेरवाडी येथे ग्रामस्थांचा वतीने साजरी करण्यात आले* आद्यक्रांतीवीर उमाजी राजे नाईक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले *या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की*भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या विरोधा ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडणारे महान आद्यक्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी वारसा पुढे चालवला तो आदिवासी, भटक्या विमुक्त बहुजन समाजातील थोर क्रांतिकार क्रांतीवीरांनी, भारतामध्ये स्वातंत्र्यलढ्यात सर्वप्रथम इंग्रज विरुद्ध बंड पुकारला ते महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा थोर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे आणि बिहार मधील आदिवासी नायक बिरसा मुंडा त्याचापैकी एक

महाराष्ट्रातील रामोशी समाजातील नरवीर उमाजी राजे नाईक असे म्हणाले*या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे म्हणाले की*भारताच्या इतिहासात अनेक गोष्टी अनैतिहासीक आहेत म्हणूनच उच्च वर्णीय इतिहासकारांनी सन १८५७ च्या उठावाला अधिक महत्व दिले. परंतु भारताचा इतिहासात खोलवर डोकावून पाहिले तर असे लक्षात येईल की, १८५७ च्या उठावाच्या आधीही काही उठाव झाले आहेत. त्यातील एक उठाव म्हणजे १८२१ चा उठाव. मात्र तथागथीत इतिहासकारांनी जाणून बुजून ह्या उठावा बाबत लिहिणे टाळले कदाचित ते लिहिले गेले असते तर उपेक्षित बहुजन समाजातील उमाजी नाईक हा क्रांतिवीर बहुजन समाजाला समजला गेला असता. मात्र इतिहास कोणाच्या लेखणीने पुसला जात नाही,अशा महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन *यावेळी महामित्र दत्ता वायचळे, विनायक बिन्नर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच.सुत्रसंचलन राजु वारुंगसे तर प्रास्ताविक दत्तुभाऊ गोफणे,व अभार संदिप लेकर यांनी मानले केले

*याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे,नारायण शेठ वाजे महामित्र दत्ता वायचळे, विनायक बिन्नर, सरपंच दत्तुभाऊ गोफणे,उपसरपंच संतोष सदगीर रोहिदास लेहकर संदिप लेहकर, भास्कर गोफणे,सदस्य राजु वारुंगसे,तंटामुक्ती अध्यक्ष नानाभाऊ वारुंगसे, नवनाथ गोफणे,किसन सदगीर, दगडू गुरकुले,बस्तीराम गुळवे भाऊराव गोफणे, आदि.ग्रामस्थ डुबेरवाडी उपस्थित होते
