
सागर प्रल्हाद राठोड चे अभिनंदन करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री जे एम थोरात व कर्मचारी वृंद
ढेकू. ( प्रतिनिधी ) ढेकू आश्रम शाळेतील विद्यार्थी सागर प्रल्हाद राठोड 100 मीटर धावणे स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरावर ती निवड. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यातर्फे सन 2025-26वर्षतील नांदगावयेथे तालुका स्तरीय विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये वैयक्तिक 100 मीटर धावणे स्पर्धेत ढेकू माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी सागर प्रल्हाद राठोड 17 वर्ष वयोगटातील स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला, तसेच त्याची जिल्हास्तरावर निवड झाली तर 200 मीटर धावणे स्पर्धेमध्ये सुनील रमेश राठोड याचा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक आला,,लांब उडी स्पर्धेत शुभम चरणदास चव्हाण इयत्ता दहावी याने तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री जितेंद्र थोरात क्रीडा मार्गदर्शक श्री भाऊसाहेब देवरे श्री सना कामडी,श्री रवींद्र चव्हाण,.श्री रवींद्र धाकतोडे या शिक्षकांचे, व शाळेचे अधीक्षक श्री कोठावदे नितीन एकनाथ या सर्वांचे मार्गदर्शन लाभले, या सर्व विद्यार्थ्यांचे ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक सरचिटणीस माननीय श्री कृष्णरावजी नेरे सर संस्थेचे अध्यक्ष श्री योगेशजी हिरे व इतर बहुजन कल्याण विभागाचे नाशिक चे सहाय्यक संचालक श्री संतोष चव्हाण साहेब यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
