
नासिक — (. प्रतिनिधी ) 184 वर्षाची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय ला जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी 14 ग्रंथ भेट म्हूणन दिले आहे. सार्वजनिक वाचनालय चे मुख्य सचिव सुरेश गायधनी व उप सचिव सोमनाथ मुठाळ सर यांनी सार्वजनिक वाचनालय कडुन पोहोच देऊन सुहास टिपरे यांच्या उपक्रम चे कौतुक केलें आहे.वाचनालय ने पोहोच देताना लिहिले आहे कि सुहास टिपरे यांच्या ग्रंथ भेटी मुळे वाचनालय च्या विकासाला चालना मिळेल व जास्तीत जास्त वाचका ना ज्ञानर्जन करण्याची संधी मिळेल समाजाच्या प्रगती मध्ये वाचनालय महत्वाची भूमिका बजावते व आपल्या सारख्या दानशूर व्यक्ति मुळे हे कार्य अधिक प्रभावी पणे पार पाडता येते. वाचनालय वरील प्रेम व विश्वास या बद्दल सार्वजनिक वाचनालय ने कृतज्ञता व्यक्त केली आहे जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांच्या या उपक्रम बद्दल मान्यवर यांनी कौतुक व अभिनंदन केलें आहे! या आधी पण सुहास टिपरे यांनी 25 ग्रंथ मागील वर्षी सार्वजनिक वाचनालय ला भेट दिले आहे. आता ही मागील महिन्यात सुर्वे वाचनालय ला सुद्धा सुहास टिपरे यांनी ग्रंथ भेट देऊन वाचन चळवळ कशी वाढवता येईल, मोबाईल चा वापर कमी करून वाचन साठी मुलांनी कसा प्रयत्न करावा, वाचन कसे करावे या साठी सिडको च्या मदर तेरेसा स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल शिवाजी चौक व ग्लोबल स्कूल, अश्विनी नगर च्या शाळा मध्ये जाऊन विद्यार्थी ना पुस्तकं वाचन साठी प्रवृत्त केलें आहे. मदर तेरेसा स्कूल च्या विद्यार्थी व विद्यार्थी नी यांनी पुस्तकं वाचन सुरु केल्याने शाळेने ज्ञानदर्पण पुरस्कार 25 देऊन, विशेष कार्यक्रम मध्ये सुहास टिपरे यांना सन्मानित केल आहे!!
