
मनमाड ( प्रतिनिधी )मनमाड येथील श्री संत बार्णबा प्राथ. व उच्च प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दादाजी उत्तमराव आहिरे सर यांना लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड यांचेकडून मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. शेषराव चौधरी व डॉ. भन्साळी यांचे हस्ते उपक्रमशील मुख्याध्यापक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. अॅड. हेमराज दुगड, सचिव ला. विवेक बरडिया, खजिनदार संजय मुथा, मनमाड नगरपालिकाचे प्रशासनाधिकारी श्री. विकासजी तरटे व लायन्स क्लबचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. दादाजी अहिरे यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सरांना या अगोदर नाशिक जिल्हा शिवसेनेचा उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दादाजी भुसे साहेब यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहेत, कालिका देवी संस्थान तर्फे नाशिक आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार देण्यात आलेला आहेत,तसेच नाशिक डायोसेसन संस्थेचा उपक्रमशील मुख्याध्यापक हा पुरस्कार दिलेला आहेत, रविदास प्रबोधनी नाशिक यांचा उपक्रमशील मुख्याध्यापक हा पुरस्कार मिळालेला आहेत, मागील वर्षी ५ सप्टेंबरला २४ ला नाशिक जिल्ह्याचे पोलिस आयुक्त कर्णिक साहेब यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहेत.
