
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२३ वा दिवस
मानवीजीवनामधील असंख्य, अनंत विसंगतींची सुबुद्ध संगती लावावयाची झाल्यास त्यासाठी आपाल्याला आपल्या तर्कबुद्धीची सीमा ओलांडावी लागेल यात शंकाच नाही. पण हे सीमोल्लंघन आपण शास्त्रशुद्ध प्रणालीने, हळूहळू, नित्यनियमित साधनेने केले पाहिजे, आणि त्याबरोबरच खुळचट समजुतींना अजीबात थारा मिळणार नाही याविषयीही खबरदारी बाळगली पाहिजे. इतर कोणत्याही शास्त्राचे अध्ययन आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने या बोधातीत, अतींद्रिय अवस्थेचेही अनुशीलन आपण करावयास हवे. हे अनुशीलन आपण तर्कबुद्धीच्या पायावरच आधारले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १८ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ९ सप्टेंबर २०२५
★ द्वितीया श्राद्ध
★ १९४२ ब्रिटिश सरकारने हुतात्मा शिरीष कुमार यांच्यावर गोळी झाडली.
★ १९५० सुप्रसिध्द संगीतकार, गायक, श्रीधर सुधीर फडके यांचा जन्मदिन.
★ २०१२ भारतीय दुग्धउत्पादनातील “धवल क्रांतीचे जनक”, अमूलचे संस्थापक, पद्मविभूषण व्हर्गिस कुरियन यांचा स्मृतिदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
