
-मनमाड 🙁 नेवैद्या बिदरी )सध्या देशातील पंजाब राज्यामध्ये झालेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण देशाचे मन हेलावून गेले आहे. याच अनुषंगाने नांदगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसा वरील होणारा खर्च टाळून मानवतेच्या सेवेसाठी अर्थातच पंजाब येथील नागरिकांना मदत व्हावी म्हणून ९ लाख रुपयेची रक्कम येथील गुरुद्वारा व्यवस्थापनाला सुपूर्द केली.नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांचा वाढदिवस ६ सप्टेंबर रोजी होता. मात्र यंदाच्या वर्षी हा दिवस उत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्याऐवजी मानवतेच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.सध्या देशातील पंजाब राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे असंख्य निरापुरात नागरिकांचे प्राण गेले असून हजारो कुटुंब उध्वस्त झाली आहेत मोठ्या प्रमाणात त प्राणी वर्गाचा नाश देखील झाला आहे.शेती आणि नैसर्गिक संपत्तीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अनेक गावांच्या अस्तित्व धोक्यात आले.या संकटात मानवी जीवनासोबतच
