
नाशिक. (प्रतिनिधी), मालेगाव येथील सुप्रसिद्ध राष्ट्रकवी, लेखक, समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान, नाशिक तर्फे प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले. यावेळी कार्यकमाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी प्रमुख वक्ते संजय निकम यांचा श्रोत्यांना परिचय करून दिला. यावेळी वक्ते संजय निकम यांनी पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात आपल्या गोदाकाठ या पुस्तका बद्दल रसिक श्रोत्यांना संपुर्ण माहिती दिली. गोदाकाठ हे शीर्षक का निवडले याचेही विवेचन केले. गोदाकाठ, इंद्रायणी, छत्रपती शिवराय, प्रेमापत्र, भगवान न्हावी, परिवर्तन, आदी कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.साहित्यिक नाना साहेब बोरस्ते यांनी कवी संजय निकम मालेगाव यांचा शाल श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.कविवर्य माणिक गोडसे यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांचे आभार मानले. जेष्ठ साहित्यिक यशवंतराव पाटील, शफिक शेख, टिपरे सर, यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम मंगळवार दि. 26/5/2026 रोजी हुतात्मा स्मारक, नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
