
नायडोंगरी ( वार्ताहर )नांदगाव येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील जवळपास 35 शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये लोकनेते अँड विजय शिवराम आहेर हायस्कूल व जुनिअर कॉलेज नायडोंगरी विद्यालयाच्या स्पर्धेकांनी मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले 1) गणेश संजय राठोड लांब उडी प्रथम (14 वर्षे गट )2) करण पन्नालाल राठोड तिहेरी उडी प्रथम (17 वर्ष गट )3) महेंद्र वसंत चव्हाण तिहेरी प्रथम क्रमांक( 19 वर्ष गट )3) सागर वाडीलाल राठोड तिहेरी उडी द्वितीय ( 19 वर्ष गट ) प्रवीण नवनाथ चव्हाण 800 मीटर द्वितीय 4×100 रिले संघ 14 वर्ष प्रथम क्रमांक 17 वर्ष प्रथम क्रमांक 4×400 रिले संघ 17 वर्षे प्रथम क्रमांक महेंद्र वसंत चव्हाण 19 वर्षे वयोगट कृष्णा शिवाजी दराडे ६०० मीटर तृतीय क्रमांक 14 वर्षे वयोगट अविनाश दशरथ गुंबाडे (200 मीटर) तृतीय क्रमांक (14 वर्ष गट) विश्वजीत सोमनाथ चव्हाण भालाफेक प्रथम (19 वर्ष गट ) पवन पांडुरंग चव्हाण भालाफेक (सतरा वर्ष गट)वरील सर्व स्पर्धेकांना क्रीडा शिक्षक श्री राजेंद्र मारणे यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व विजयी स्पर्धेकांचे संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. विलासराव विजय आहेर यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या सौ.पी. व्ही.आहेर, उपमुख्याध्यापक श्री. टी.ई.मवाळ पर्यवेक्षक श्री. पी. एन. सोनेज , संस्थेचे संचालक मुख्य लिपिक श्री बाळासाहेब भोसले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवकांनीही अभिनंदन केले.
