
लासलगाव (प्रतिनिधी) हिंदी दिवसाचे औचित्य साधून देश विदेशात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्याअंतर्गत लासलगाव येथील नुतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागाद्वारे हिंदी सप्ताह चे आयोजन करण्यात आले या सप्ताहाचे उद्घाटन सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी संगमनेर महाविद्यालयाचे हिंदी प्राध्यापक व रेडियो निवेदक डॉ. जितेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. हिंदी भाषेतून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी ओळखून पुढे जाण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थांना केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेबरोबरच स्थानिक भाषांना अनन्य साधारण महत्व देण्यात आले आहे. आज हिंदी भाषेतून द्विभाषक, रेडियो जॉकी, अनुवादक, पटकथा लेखन, विज्ञापन लेखन, समाचार लेखन सारख्या मिडिया क्षेत्रातील नव-नविन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून तसे कला-गुण आत्मसात करून आजच्या युवा पिढीने पुढे जाण्याची तयारी करावी. मोबाईल सारख्या माध्यमातून ब्लॉग लेखन, शैक्षणिक रील्स मेकिंग करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता ती कल्पकता विद्यार्थांनी दाखवावी. हिंदी सप्ताह अंतर्गत होत असणाऱ्या सृजनात्मक लेखन, पारिभाषिक शब्दावली एवं अनुवाद, हिंदी श्रुतलेखन, लघु कथा लेखन, भेंट कार्ड व पोस्टर लेखन, निबंध लेखन सारख्या स्पर्धा विद्यार्थांच्या कला गुणांना वाव देतील. भाषा शिक्षणातून केवळ शिक्षकच बनता येते ही मानसिकतेतून बाहेर पडून आपण या नविन रोजगाराच्या संधीचे सोने करावे. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आदिनाथ मोरे यांनी डॉ. पाटील यांचे स्वागत केले व हिंदी सप्ताहसाठी शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्तविक करताना हिंदी विभागाध्यक्ष बापू शेळके यांनी सप्ताह अंर्तगत होणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा मोनिका अंदोर यांनी केले तर सूत्रसंचालन कु. निकिता कोल्हे व कल्याणी दरेकर आभार प्रदर्शन पूजा आव्हाड या विद्यार्थांनी केले.
