
जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जेष्ठ प्रा. पी. जी. माने यांना गिरणा गौरव प्रतिष्ठानचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील शंकराचार्य न्यास कुर्तकोटी सभागृहात संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात सुप्रसिध्द कवी प्रा. संदिप जगताप, मंत्रालयातील अवर सचिव नंदकुमार राऊत, सानेगुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रविण जोशी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार आदी मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

तसेच मालेगाव येथील समर्थ प्रतिष्ठानचा दैनिक बालेकिल्ला आदर्श शिक्षक पुरस्कार दाभाडी येथील रोकडोबा हनुमान मंदिर येथे झालेल्या सोहळ्याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. माने यांना अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी, सर्व संचालक, विश्वस्त पदाधिकारी, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
