
नांदगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय विश्रामगृहात येथे नांदगाव शहरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत नांदगाव नगर पालिकेच्या हलगर्जीपणा मुळे शहरातील गणेश मंडळाची गैरसोय झाली. त्याबद्दल नांदगाव नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत तसेच मुख्याधिकारी आणि दोन प्रशासकीय अधिकारी यांचा निषेध करत तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची या वेळी पालीका प्रशासनाचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला. येत्या काळात अशा प्रकारची गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी नांदगावचे आ.सुहास कांदे यांच्या प्रतिनिधीचे औपचारिक मागणी सादर करण्यात आली.
