
बोलठाण ( प्रतिनिधी)नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन यादी मधून अपात्र लाभार्थ्यांची यादी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत ने नांदगाव पंचायत समितीला पाठवून देखील नांदगाव पंचायत समितीमधील अधिकाऱ्याने शासनाचा आदेश डावलून व ग्रामपंचायतच्या पत्र यादीला डाउनलुन दुर्लक्ष केले व अपात्र लाभार्थ्यांची नावे त्यांच्या बँक अकाउंट वर पहिला हप्ता 15000 वर्ग केला त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणी सह विविध मागण्यांसाठी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा संविधान आर्मी चे नांदगाव तालुका अध्यक्ष हे दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी बुधवारपासून रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत अमरण उपोषण करणार असल्याची माहिती मुक्ताराम बागुल यांनी बोलताना दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव पंचायत समितीने रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन यादी मधून पात्र /अपात्र लाभार्थ्यांची यादी मागविली होती. त्या अनुषंगाने ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून नांदगाव पंचायत समिती कडे पाठविली होती. परंतु नांदगाव पंचायत समितीने सदरची अपात्र लाभार्थींची नावे पात्र लाभार्थ्यांची यादी मधून कमी करणे ऐवजी अपात्र लाभार्थ्यांची नावे शासनाच्या नियमाप्रमाणे आदेशाप्रमाणे पहिला हप्ता पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केला. जवळजवळ आतापर्यंत एक वर्ष होत आले असून देखील अपात्र लाभार्थ्यांची नावे पाच लाभार्थ्यांमधून कमी करण्यात आली नाही. त्यामुळे सदरच्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व त्याला विलंबित करण्यात यावे, रोहिले बुद्रुक ते गिरी रस्ता हा शिवर रस्ता करण्यात आलेला आहे. परंतु त्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असून सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. इस्टिमेट प्रमाणे काम झालेले नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या खोदण्यात आलेल्या नाहीत. त्या रस्त्याचे कामाचे आत्तापर्यंत जवळजवळ सात ते आठ लाख रुपये काढल्याचे समजते. त्यांच्या सह्या बिलावर असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच रोहिले बुद्रुक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी संपूर्ण गावातून रस्त्यावरील पाणी वाहून येऊन तुंबते. त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी तयार होते व आजाराला आमंत्रण देते. त्यामुळे या पुतळ्याच्या आवारात पाणी तुंबू नये म्हणून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ग्रामपंचायतीने काढलेल्या अतिक्रमानाची माती, दगड, मुरूम यांची ढीग काढून सपाटीकरण करण्यात यावी व नालीचे खोदकाम करून नादी करून सदरचे पाणी गावाच्या बाहेर काढून देण्यात आले, रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये अनेक लोकांनी अतिक्रमण केली आहेत. त्या अतिक्रमण धारकांची त्याच्या कुटुंबासह ग्राम पंचायतीच्या अतिक्रमण रजिस्टर मध्ये नोंद करून त्याच्या नकला मिळाव्यात व अतिक्रमण धारकांची अतिक्रमण केले असल्याचे दाखले मिळावे रोहिले बुद्रुक येथील मुक्ताराम रतन बागुल यांच्या नावे सण 19 16 17 मध्ये रमाई आवास घरकुल योजनेतर्गत घरकुल मजूर झाले होते. सदर घरकुलाचे काम पूर्ण केले. सदरचा प्रस्ताव घरकुल पूर्ण झाल्यानंतर सरपंच ग्रामसेवक सरपंच यांच्या स्वाक्षरी घेऊन नांदगाव पंचायत समितीकडे जमा केल्यानंतर नांदगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून घरकुलाचे मोजमाप च्या आधारे घरकुल पूर्णत्वाचा दाखला दिला. रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने या पूर्णत्वाच्या दाखल्याच्या आधारे ग्रामपंचायतच्या नमुना नंबर आठ मध्ये नोंद न करता पूर्णत्वाच्या दाखल्या पेक्षा कमी क्षेत्रफळाचे नोंद करून आठचा उतारा तयार केला. त्यावेळीच्या ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक यांनी पैसे मागितले आणि ते न दिल्यामुळे त्यांनी पूर्णत्वाच्या दाखल्यानुसार आठ चा उतारा बनवला नाही. सदरच्या नांदगाव पंचायत समितीच्या घरकुल पूर्णत्वाच्या दाखल्याच्या आधारे आठ अ चा उतारा मिळावा. तसेच रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत हळदीच्या जवळ असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर असलेल्या जागेची व आरसीसी घराची नोंद रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने शासनाची परवानगी आणलेली नसताना देखील. नोंदणीकृत दस्तऐवज नसताना देखील. पैसे घेऊन ग्रामपंचायतच्या कर वसुलीच्या नावाखाली जागेची व घराची बेकायदेशीर ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर आठ अ च्या रजिस्टर मध्ये नोंद केली आहे तरी सदरची चौकशी करून ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच आणि त्यावेळी ग्रामसेवक यांच्यावर बेकायदेशीर काम केले म्हणून कारवाई करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अमरणपोळी सोडणार नाही असा इशारा मुक्ताराम बागुल माजी ग्रामपंचायत सदस्य तथा संविधान आर्मी नांदगाव तालुका अध्यक्ष यांनी दिला आहे. सदस्य निवेदन नांदगाव पंचायत समिती, तहसील कार्यालय नांदगाव, पोलीस स्टेशन नांदगाव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक, जिल्हाधिकारी नाशिक यांना उपोषणाबाबत निवेदन देण्यात आलेली आहेत.
