
बोलठाण ( प्रतिनिधी)नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम हे दिनांक 26 जानेवारी 2024 मध्ये ग्रामसभेत झालेला निर्णयानुसार नवीन ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम तळमजल्यावर बांधण्यात यावे या मागणीसाठी बोलठाण ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य मनोज रिंढे यांनी बोलठाण येथील ग्रामपंचायत हद्दीत अमरण अन्न त्याग उपोषण सुरू केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील बोलठाण ग्रामपंचायतीने सन 2024 च्या अगोदर जुनी ग्रामपंचायत पाडून त्या जागेवर नवीन ग्रामपंचायत बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यात तळ मजल्यावर दुकान गाळे व वरच्या मजल्यावर ग्रामपंचायत कार्यालय असे बांधकाम करण्याचे ठरले होते. सदर निर्णयास समस्थानकडून प्रचंड विरोध झाला. आणि 26 जानेवारी 2024 च्या ग्रामसभेत सदर बांधकाम रद्द करून ग्रामपंचायत कार्यालयची इमारत तळमजल्यावर घ्यावी. जेणेकरून वयोवृद्ध, दिव्यांग, महिला आदि नागरिकांना त्रास होणार नाही. असा ठराव पारित (मंजूर) करण्यात आला होता. त्यामुळे सदरचे बांधकाम तब्बल एक ते दीड ठेवण्यात आले. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने पुन्हा खाली व्यापारी गाडी वरच्या मजल्यावर ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे. त्यामुळे बांधकाम तात्काळ थांबवावे व ग्रामपंचायत कार्यालय खाली तळमजल्यावरच घेण्यात यावे. व ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोणतेही दुकान व गाळे बांधण्यात येऊ नये अथवा ग्रामपंचायत कार्यालय मागे घेऊन पुढे गाळे करू नये. कारण 26 जानेवारी व 15 ऑगस्ट तसेच सार्वजनिक उत्सव हे ग्रामपंचायत समोर होतात त्यामुळे ग्रामपंचायत समोर गाळे बांधू नये. तसे झाल्यास ग्रामपंचायत च्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले असून सदरचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायती विभाग, जिल्हा परिषद नाशिक, विभागीय आयुक्त, आयुक्त कार्यालय नाशिक आणि ग्रामपंचायत बोलठाण आदींना देण्यात आले आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण अन्न त्याग उपोषण सुरूच राहील असा इशारा उपोषण करते यांच्यासह नागरिकांनी दिला आहे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे.
