
मालेगाव (वार्ताहर) नाशिक जिल्ह्यातील अंशतः विनाअनुदानित शिक्षकांनी ना. दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना स्वर्गीय धर्मवीर आनंदजी दिघे यांची प्रतिमा भेट दिली. वाढीव २०% अनुदान घोषित केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने भुसे यांचे आभार मानले. प्रा. किरण जगताप यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची प्रतिमा भेट देण्याचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रा.किरण जगताप, प्रा. प्रतीक बच्छाव, प्रा. आत्माराम ठाकरे , प्रा. महेंद्र पवार, मुख्याध्यापक राजेश बोरसे , शरद शेलार, मालेगाव तालुका विज्ञान अध्यापक कार्याध्यक्ष सुवर्णसिंग ठोके, नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बच्छाव आदी उपस्थित होते.
