
नाशिक (प्रतिनिधी )| मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक आयोजित जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धला उत्साहात सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र नाशिक शहर संचालक ॲड.लक्ष्मण लांडगे हे होते.व्यासपीठावर मविप्र शिक्षणाधिकारी प्रा.भास्कर ढोके,तालुका क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, संजय होळकर,प्रा.पिराजी नलावडे,सुभाष खाटेकर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे,पुष्पा लांडगे,पंच दिपक उपासनी मंदार भागवत,राहुल चौधरी,जीवराम गावले,सुरेखा दिवेकर,अश्विनी येवला,स्वाती मुळे,शर्मिला डोंगरे,जयश्री भामरे,रेखा पवार, संगिता गोरे,हर्षाली पवार,योगिता शिलारकर,मंजू टिलवानी,रुपाली शेट्टी,रितीका झाल्टे,प्रिया जोशी,मनिषा गायकवाड क्रीडा शिक्षक बाळासाहेब गायकवाड,सुयश कुंभार्डे उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची देवता सरस्वती व ओमकार प्रतिमा पूजन,दिपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले.उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.प्रमुख अतिथी मनोगतातून प्रा.भास्कर ढोके यांनी योगाचे मानवी जीवनातील असणारे महत्त्व सांगत स्पर्धेकांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.पंच दिपक उपासनी यांनी सदर स्पर्धेचे नियम समजावून सांगितले.स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.अध्यक्षीय मनोगतातून ॲड लक्ष्मण लांडगे यांनी आयोजकांना व स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या.जिल्हास्तरीय या स्पर्धेत अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब गायकवाड यांनी केले.फोटो – जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत उपस्थित मान्यवर आदी.
