
..ओझर( नंदकुमार न्याहारकर).८ वार्ताहर मराठा विद्या प्रसारक समाजाचे ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सुभाष केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दातृत्वाच्या भावनेतून विद्यालयाच्या ज्येष्ठ उपशिक्षिका सीमा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांनी गरीब होतकरू ४० विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य खरेदी करून शालेय परिपाठ समयी साहित्याचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर शिक्षिका मंगल सावंत आत्माराम शिंदे सरोज खालकर संगीता भदाणे मेघा शेजवळ संगीता शेटे शितल आहेर उपस्थित होते. यानिमित्त शिक्षिका सीमा पाटील यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षिका मंगल सावंत यांनी केले.
