
उपक्रमशील आदर्श अभ्यासू गुणवंत शिक्षिका अंदरसूल जिल्हापरिषद मुलींची आदर्श शाळा आपुलकी बहुउद्देशीय संस्था नासिक यांचे वतीने गुणवंत आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले
अंदरसूल (प्रकाश साबरे)
राज्यात नव्हे जागतिक पातळीवर जिल्हापरिषद मुलींची शाळा पोहचली कारण या जिल्हापरिषद मुलींची शाळेत उपक्रमशील आदर्श अभ्यासू शिक्षिका आशा वर्पे यांच्या कल्पनेतून मुलींना जापानी भाषा अवगत असावी या दूरदृष्टीकोनातून मुलींना त्यांनी जापानी भाषा शिकविली त्यांना योग्य ते मार्गदर्शन प्रशिक्षण दिले या उपक्रमांची ख्याती महाराष्ट्रात पोहचली असून ना छगनराव भुजबळ यांनी भेट देऊन कौतुक केले

अंदरसूल जिल्हापरिषद मुलींची आदर्श शाळा येथील उपक्रमशील आदर्श अभ्यासू शिक्षिका आशा वर्पे यांना गुणवंत शिक्षिका म्हणून नासिक सन्मानित करण्यात आले
त्याच प्रमाणे देशातून शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब बेरगल यांच्याशी संवाद साधला या शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब बेरगल व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रसंगी आर्थिक झळ सोसून अनेक उपक्रम पालक ग्रामस्थ शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत सर्व स्तरावरील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून राबविले सर्व शिक्षकांनी योगदान देऊन आदर्श शाळा बनविली शाळेचे कृतिशील उपक्रमशील मुख्याध्यापक बाबासाहेब बेरगल यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्हापरिषद आदर्श शिक्षक तसेच गिरणा गौरव प्रतिष्ठानासिक यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले त्याचा प्रमाणे या शाळेची दखल राज्यस्तरावर घेतली गेली त्या उपक्रमांच्या उपक्रमशील आदर्श अभ्यासू गुणवंत शिक्षिका आशा वर्पे यांचा नासिक येथील आपली आपुलकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला आहे या सर्व उपक्रमांचे यशस्वितेसाठी शाळेचे सर्व शिक्षक सांघिक प्रयत्न करीत होते या सर्व गुणवंत ज्ञानवंत सामाजिक जाण व भान असणारे शिक्षकांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे

अंदरसूल येथील जिल्हापरिषद मुलींची आदर्श शाळा मुख्याध्यापक बाबासाहेब बेरगल यांना गिरणा गरव प्रतिष्ठानासिक चे वतीने सन्मानित करण्यात आले
