
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२२ वा दिवस* ज्याला मोक्ष हवा आहे त्याने अहिंसाव्रतात प्रतिष्ठित झाले पाहिजे. जो अहिंसाव्रतात पूर्णतया प्रतिष्ठित झाला त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान कोणीही नाही. त्याच्या समक्ष कोणी भांडू शकणार नाही किंवा लढू शकणार नाही. तो जिथे असेल तिथे केवळ त्याच्या अस्तित्वानेच शांती व प्रेमभाव ही उत्पन्न होतात, त्यासाठी दुसऱ्या कशाचीच आवश्यकता नसते. त्याच्या समक्ष कोणीही रागावू वा लढू शकणार नाही. अगदी भयानक असे हिंस्र प्राणीही त्याच्यापुढे शांत होतील. सर्वच महापुरुषांची शिकवण आहे की, अशुभाच्या वा वाईटाच्या प्रतिकाराचा प्रयत्न करू नका, अशुभाचा प्रतिकार न करणे हाच सर्वोच्च नैतिक आदर्श होय.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १७ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
*★ भाद्रपद वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ८ सप्टेंबर २०२५ ★ प्रतिपदा श्राद्ध
★ १९३३ गेली पन्नास वर्षे आपली स्वरमोहिनी कायम ठेवणाऱ्या जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्मदिन.
★ १९६० स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राजकीय नेते, प्रखर भ्रष्टाचार विरोधक व इंदिरा गांधी यांचे पती फिरोज जहांगीर गांधी यांचा स्मृतीदिन
★ १९९१ मराठी लेखक, कवी, साहित्यिक वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा स्मृतीदिन
★ आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
★ जागतिक शारीरिक उपचार दिन…
