
नांदगाव (नांदगाव प्रतिनिधी )नांदगाव तालुक्यात अनेक वर्षांपासून आपल्या दमदार निर्भीड लेखणीने अन्यायाला वाचा फोडत सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्काचा बुलुंदआवाज होऊनशासकीय,निमशासकीयशाळा,कॉलेज,खाजगी संस्था,इतर अनेक ठिकाणी योग्य वाचा फोडली आहे. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन आपल्या परखड लेखणीतून ओळख निर्माण केली आहे.तसेंच अनेक पुरस्काराने सन्मानीत असुन याही वर्षी देखील पत्रकार प्रज्ञानंद (बापु )जाधव यांची नुकत्याच झालेल्या आस्था सामाजिक संस्था पालघर, मुंबई येथील महाराष्ट्र समाजदूत नामांकन नियुक्तीची त्यांच्या कार्याची योग्य दखल घेऊन निवड झाली

असुन आज दिनांक 7/9/2025 रोजी त्यांना ऑनलाईन पद्धतीने संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र भोईर यांनी सन्मानपत्र देऊन गौरवीले आहेत.तसेच नांदगावला झालेल्या अंजुमताई सुहास कांदे यांच्या जन्म दिनानिमित्त होम मीनिस्टर कार्यक्रमात पत्रकार प्रज्ञानंद (बापु) जाधव यांना स्वतः समृद्धी बैंकेचे चेअरमन अंजुमताई कांदे यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर जाधव यांनी केले होते यांची निवड झाल्याने सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,सांस्कृतीक क्षेत्रातील नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
