इंजिनिअर कवी -वाळू आहेर नाशिक

लवकर ये,दौडत ये घनाकृपाळा
सहन होईना तापदायक उन्हाळा
ग्रीष्माने तरूवर वेली निष्पर्ण झाले
पशूपक्षी मानवप्राणी हैराण झाले||१||
एसी कुलर पंखे काम करेना झाले
सावलीच्या सगळेच शोधात निघाले
डोंगर बोडके ,जंगले,झाडं तोडले
नद्यानाले ,तळी, धरणे कोरडी झाले||२||
सगळीकडील पाणीसाठे कमी झाले
सरकारी पाण्याची कपात लागू झाली
टॅंकरच्या लाॅबीवाले कामाला लागले
जंगलात पाणवठे तयार जाहले||३||
हवामान खाते वायदे करू लागले
धरण उशाला आणि कोरड घशाला
हताश बळीराजा नेई हात डोक्याला
आणि त्याची नजर लागली आभाळाला||४||
धरणी हासली बघून काळ्या ढगाला
लवकर ये म्हणते राजा पावसाला
आताशा पावशाही बांग देऊ लागला
काळे काळे ढग दाटलेय आकाशाला ||५||
कडाडली विज, जोरात वारा सुटला
टपोरे थेंबांना घेऊन पाऊस आला
मृदगंधही चोहीकडे दरवळला
ओलीचिंब धरा उभी राहे स्वागताला||६||
इंजिनिअर कवी -वाळू आहेर नाशिक
